नगर – शहरासह उपनगर भागातील बचत गटाच्या महिलांनी खाजगी फायनान्सकडून कर्ज घेतले आहे. मात्र, या कर्जाचा खाजगी फायनान्सकडून वारंवार तगादा करण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात बचत गटाचे कर्जाचे हप्ते माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवकचे जिल्हा शहर संघटक मतीन सय्यद, जीनत बागवान, तस्लिम शेख, फरिदा शेख, हिराबाई आहेर, फातेमा शेख, अनिता पाचरणे, कल्पना सोनवणे, रीना पल्ले, आशा बांगडी, मनिषा भोसले, शाहीन शेख यांसह विविध बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शहरासह भिंगार, आलमगीर, मुकुंदनगर, केडगाव, सावेडी, एमआयडीसी मधील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून खाजगी फायनान्स कडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. सध्या अनेक व्यवसाय व उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली असली तरी सर्व व्यवसायामध्ये मंदिचे सावट आहे.