सासवड -गुऱ्होळी (ता. पुरंदर) येथील ्मुंबईवरुन आलेल्या एका व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील 9 जणांना सासवडच्या करोना सेंटरमध्ये हलविले होते. त्यामधील त्या व्यक्तीच्या आईचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्या महिलेचा मृत्यू (दि. 10) झाल्याची माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
गुऱ्होळी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या 82 वर्षीय आईचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे येथे शासकीय दवाखान्यात त्या उपचार घेत होत्या. तालुक्यात बाधितांची संख्या 12 झाली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहेत. दवाखान्यात एकूण 4 रुग्ण आहेत तर 6 जण उपचार घेऊन परतले आहेत. गुऱ्होळी येथील एका रुग्णाच्या संपर्कातील त्यांची आईचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.
त्याच्या कुटुंबातील तिघेजण पॉझिटिव्ह
गुऱ्होळी येथील मुंबईहून आलेल्या एका पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुरंदर करांच्या चिंतेमध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यांच्यावर पुणे येथे शासकीय दवाखान्यात उपचार सुरु करण्यात आले आहेत.