लोणावळा(वार्ताहर) -मळवली येथील पाटण गावाच्या हद्दीमध्ये लोखंडी बनावटीचे गावठी पिस्तूल बेकायदेशीररित्या जवळ बाळगणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीला पोलिसांनी जेरबंद केले.
महाराजसिंग दोहारे (वय 30, रा. रामपुरा, मध्य प्रदेश सध्या रा. पाटण, मळवली) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोहारेजवळ बेकायदेशीर पिस्तूल असल्याची खबर गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, पो. शि. शरद जाधवर, संदीप बोराडे यांनी सापळा रचित महाराजसिंग दोहारे याला जेरबंद करीत त्याच्या कमरेला लावलेलं पिस्तूल जप्त केले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.