पिंपरी(प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच्या कामांना गती देण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या कामांवरून तसेच आपत्ती व्यवस्थापनावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते.
गेल्या तीन दिवसांपासूनच शहरात पाऊस सुरु झाला आहे. करोनातील लॉकडाऊनमुळे पावसाळी कामे सुरू करण्यास यावर्षी उशीर झाला होता. त्यातच बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे वाभाडे निघाले होते. सर्वसाधारण सभेत झालेल्या टीकेनंतर प्रशासन जागे झाले असून शहरातील उखडलेले रस्ते, गटारी, ड्रेनेजे, नाले सफाई व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.-