पुणे : राज्यातील ओला उबेरची सेवा आता पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे. मुंबईसह इतर ७ शहरांमध्ये हि सेवा सुरु झालेली आहे. पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये ओला उबेर सुरु झाली असून शहरात किंवा शहराबाहेर जाण्यासाठी टॅक्सीसेवा उपलब्ध असेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत तसेच घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये दोन प्रवासी आणि एक ड्रायव्हरचं प्रवास करू शकतील. एवढेच नाही तर प्रवासाचे कारण देखील प्रवाशांना सांगावे लागणार आहे. तसेच टॅक्सीतील सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.