भाईजान सलमान खानला बॉलिवूडचा “दबंग’ बनवणारा चित्रपट आता लहान मुलेही एन्जॉय करणार आहेत. दबंग आता ऍनिमेटेड सीरिज स्वरूपात दिसणार आहे. कार्टूनद्वारे एक वेळा पुन्हा चुलबुल पांडे, छेदी सिंग, रज्जो आणि प्रजापती हे पात्र रसिक अनुभवणार आहेत. या ऍनिमेटेड सीरिजमध्ये दंबगची कहाणी पूर्णपणे मुलांसाठी असून संपूर्ण कुटुंबाला याचा आनंद घेता येईल.
सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खान याने म्हटले आहे की, दंबग आता ऍनिमेशन क्षेत्रात प्रवेश करत आहे. ऍनिमेटड चुलबुल पांडे यात कल्पकतेला वाव दिला जाणार असल्याने ही सीरिज खूपच मनोरंजक होणार आहे. चुलबुल पांडे ही व्यक्तीरेखा मुले पुन्हा एकदा पाहू शकतील आणि आनंद घेतील.