पुणे – रुबी हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांना करोना संसर्ग झाला होता. त्या पाठोपाठ आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
करोना रुग्णांसाठीच्या स्वतंत्र विभागात काम करणाऱ्या 12 “हाऊसमन’ डॉक्टरांना करोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी तिघांना लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले.