चंद्रपूर- चंद्रपूर येथे आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले आहे. बिनबा गेट परिसरात होम क्वारंटाइन मधे असलेली 23 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालातून सिद्ध झाले.
स्थानिक बिनबा गेट परिसरात 9 तारखेला यवतमाळात येथून आलेली एक 23 वर्षीय मुलगी होम क्वारंटाइन करण्यात आली होती. तिचे नमुने 11 तारखेला घेण्यात आले होते त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यवतमाळ येथिल खाजगी रुग्णालयात भरती असलेल्या आपल्या आईची शुश्रूषा करण्यासाठी भावासह यवतमाळ येथे होती. ते सर्व लोक दिनांक 9 मे रोजी कारने चंद्रपूरला परत आल्यावर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. पण लक्षणे आढळल्याने त्या मुलीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्राप्त अहवालानुसार ती मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले असुन तिला आयसोलेशन वॉर्ड मधे दाखल करण्यात आले आहे. कुटुंबीयांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, बिनबा गेट परिसर पुढील 14 दिवसांसाठी सील करण्यात आला असुन तिथे आता युद्धपातळीवर नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.