मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. जगात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 35 लाख 65 हजार 310 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 48 हजार 565 वर पोहोचली आहे. तसेच कोरोनापासून जगभरात 11 लाख 54 हजार रुग्ण बरे झाले आहेत.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगाची तुलना केल्यास एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 35 टक्के रुग्ण आहेत. ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 11 लाख 88 हजार 112 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 68 हजार 598 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 78 हजार 263 लोक बरे झाले आहेत.
अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचा जास्त परिणाम पाहायला मिळातो आहे. स्पेनमध्ये 2 लाख 47 हजार 122 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 25 हजार 264 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेननंतर कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 28 हजार 844 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 10 हजार 717 इतका आहे.