औरंगाबाद : मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद कोरोना हॉस्पॉट होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील तीन दिवसात शहरात कोरोनाचे तब्ब्ल ७५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दुपारपर्यंत नवीन ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने औरंगाबादेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 128 वर पोहचली आहे.
आज सापडलेल्या ११ रुग्णांत नूर कॉलनी, आसिफिया कॉलनी, किल्ले अर्क, गारखेडा, भीमनगर परिसराचा समावेश आहे. कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रसाशनाने रुग्ण सापडलेले विभाग सील करण्यात आले आहे. शहर रोज नवीन रुग्णाची भर पडत असल्याने प्रशासने लॉकडाऊनचे नियाम अधिक कडक करण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान, अमरावतीमध्येआजआणखीएक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. शहरातील चेतनदास बगीच्या येथील 74 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉजिटिव आल्याने नागरिकात भीती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रसाशनाने दिलेल्या माहितीनुसार 14 अहवाला पैकी 13 अहवाल निगेटिव्ह आले असून यातील 1 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.अमरावती आतापर्यन्त आढळलेल्या रुग्णांची संख्या 28 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 जण कोरोनमुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.