पिंपरी : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरासमोर घडली.
शांताबाई खंडागळे (वय 75, रा. चिंचवड) असे मृत्यू झालेला महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शिवाजी खंडागळे (वय 50) यांनी शुक्रवारी (दि. 24) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई दररोज मोरया गोसावी मंदिरासमोर भिक्षा मागण्यासाठी जात होत्या. शुक्रवारी सायंकाळी मंदिरासमोर एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.