बॉलीवूड किंग शाहरुख खान हा लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा चाहत्यांशी जोडला गेला आहे. सोशल मीडियावर शाहरुख हा चाहत्यांशी नेहमीच संवाद साधतो. आता त्याने “आस्कएसआरके सेशन’चे आयोजन केले होते.
यादरम्यान चाहत्यांनी शाहरुख खानला उलटसुलट प्रश्न केले. परंतु शाहरुखनेही त्यास चांगले उत्तर दिले आहे. एकाने विचारले की, सिगारेट सोडण्यासाठी काय करू. त्यावर शाहरुख म्हणाला की, मित्रा, तू चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारला आहेस. प्रयत्नासाठी तुला शुभेच्छा. शाहरुख खानचे हे ट्विट खूपच व्हायरल होत आहे. लोकांनी त्यावरही प्रतिक्रिया दिल्या आहेत.