बारामती (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आलेल्या केंद्रीय पथकाने शहरात राबविण्यात येत असलेल्या भीलवाडा तसेच, बारामती पॅटर्नची माहिती घेत नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलीस पोलिस प्रशासनाच्या कामाचा आढावा घेतला. श्रीराम नगर म्हाडा कॉलनी या कोरूना बाधित क्षेत्राची त्यांनी पहाणी केली.
डॉ. अरविंद अलोणी व डॉ. पी.के. सेन हे दोन केंद्रीय समितीचे सदस्य आज (दि.२३) दुपारी बाराच्या सुमारास बारामतीत दाखल झाले. प्रथम त्यांनी शहरातील सिध्देश्वर गल्ली परिसरात, म्हाडा कॉलनी, श्रमिकनगरला भेट दिली. त्यानंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी शहरातील कोरोना विषय सविस्तर माहिती केंद्रीय पथकाला दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांची माहिती केंद्रीय पथकाने घेतली.
उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्य़ुबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
बारामती शहरात केंद्रीय पथक दाखल होणार असल्याने शहरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. लोक डॉन ची तीव्रता वाढविण्यात आली होती.
या कामांचा घेतला आढावा :
- नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बारामती शहरातील नागरिकांचा केलेला सर्वे.
- सिल्वर जुबली रुग्णालयातील कामकाज व सुविधा तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या यांची माहिती घेतली.
- कुरुंदा बाधित क्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी.
- बारामती पॅटर्न अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती.
- पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामांची माहिती.