मुंबई – कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. मात्र या काळात सोशल मीडियाचा वापर करत सर्व लोक कोरोना बाबत जनजागृती करत आहे. यातच करोना व्हायरसचा भारतातील जनतेला मुकाबला करता यावा यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू नावाचे ऍप सुरू केले आहे. यामुळे करोना व्हायरसचा रुग्ण नजीकच्या परिसरात आल्याची माहिती मिळते. हे ऍप आपल्या मोबाइल फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर आपल्या नजीकच्या परिसरामध्ये कोणी करोनाचा रुग्ण असल्यास त्यापासून स्वतःचा बचाव करण्यास मदत होते.
Dhanyawad @PMOIndia @narendramodi for creating a personal bodyguard for every Indian to fight COVID-19. #SetuMeraBodyguard hai aur aapka bhi.
Download @SetuAarogya now!
#IndiaFightsCoronahttps://t.co/fU7MfKfDwM pic.twitter.com/MHi7SMSTGD
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 22, 2020
गेल्या 13 दिवसांमध्ये भारतातील तब्बल 5 कोटी लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. त्यामुळे हे ऍप जगात सर्वात वेगाने वाढणारे ऍप ठरले आहे. याच अप्सची माहिती बॉलिवूडचा ‘सिंगम’ अजय देवगणने व्हिडीओद्वारे केली आहे.
Well said @ajaydevgn.
Aarogya Setu protects us, our family and the nation.
Download the App and strengthen the fight against COVID-19. https://t.co/W8ZMyEWfRy
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2020
दरम्यान, अजयने आपल्या व्हिडीओत या अॅपचे महत्त्व अधोरेखित केले आहे.’कोरोनाविरूद्धच्या लढ्यात प्रत्येक भारतीयाला स्वत:चा पर्सनल बॉडीगार्ड दिल्याबद्दल पीएम नरेन्द्र मोदींचे आभार. सेतू माझा बॉडीगार्ड आहे आणि तुमचाही़ आत्ताच डाऊनलोड करा, ‘ असे हा व्हिडीओ शेअर करताना अजयने लिहिले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अजयने अमिताभ बच्चन, सलमान खान, काजोल, अक्षय कुमार, रणवीर सिंग आदींना टॅग केले आहे. मोदींनी केले कौतुक अजयचा हा व्हिडीओ पाहून नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले. खूप छान अजय देवगण, अशा शब्दांत त्यांनी अजयची पाठ थोपटली.
हा व्हिडीओ नेमका आहे तो आरोग्य सेतू अॅपचा. होय, सरकारने भारतातील 130 कोटी जनतेची सुरक्षा लक्षात घेता हे अॅप बनवले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका व जोखिम याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आले आहे. हे अँप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरसबाबतच्या धोक्यापासून अलर्ट करेल आणि तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात की नाही हे सांगते.