सांगली – सांगलीमधील मिरज येथे १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार कऱण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाउन असल्यने तरुणी मिरजमध्येच अडकली होती. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींनां अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील ही तरुणी मिरजेत मैत्रिणीकडे आली होती. लॉकडाउन असल्याने पुन्हा घरी जाणं तिला शक्य नव्हतं. पीडित तरुणी व तिची मैत्रीण रात्री घराबाहेर गप्पा मारत बसल्या होत्या. काही वेळाने मैत्रीण निघून गेली. यावेळी तिला दोघांनी गाठून मद्य पाजून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडितेने पोलिसात दोघांविरुद्ध फिर्यात दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित दोघांना अटक केली आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.