लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये सर्व कलाकार मंडळी आपापल्या घरामध्ये अडकून पडले आहेत. नेहमी व्यस्त असलेल्या कलाकारांना घरात काय करावे, असा प्रश्न पडला आहे. मात्र या सुटीचा विनियोग आपल्या पुढच्या सिनेमाच्या तयारीसाठी करण्याचे अनिल कपूरने ठरवले आहे. घरात बसूनच पुढच्या सिनेमाची जुळवाजुळव आणि रिसर्च आपण सुरू केल्याचे त्याने अलीकडेच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले.
सध्या तो फोनवरून मिटींग करतो आणि व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांशी चर्चाही करतो. सध्या जे काही करायचे आहे,ते व्हर्च्युअलीच करायला लागणार हे समजून चुकल्याने त्याने आपले वेळापत्रकही त्यानुसारच बनवले आहे. 61 वर्षांच्या अनिल कपूरने या लॉकडाऊनच्या काळातही नेहमीप्रमाणे व्यवस्थित व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवले आहे.
करण जोहरच्या “तख्त’साठी अनिल कपूरने स्वतःचे ट्रेनिंग सुरू ठेवले आहे. या सिनेमात करिना कपूर-खान, विकी कौशल, रणवीर सिंह, आलिया भट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर आदी बरीच कलाकार मंडळी आहेत. या सिनेमाच्या तयारी व्यतिरिक्त आपल्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालवायला अनिल कपूरला विशेष आवडते आहे. आपल्या घरच्यांबरोबर वेळ घालवायला निमित्त गरजेचे नाही, असे तो म्हणाला आहे.