पंधरवड्यात एकही रूग्ण नाही
नवी दिल्ली : जगभरात आतापर्यंत 20 लाखाहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 20 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात कोरोनाबाधितांची संख्या 14 हजारवर पोहोचली आहे तर दोन हजारच्या जवळपास कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत.
तर चारशे जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, भारतातील गोवा या राज्यातून एक समाधानाची बातमी आहे. या राज्यात करोना विषाणूचा सहावा रुग्णही बरा झाला आहे. आता गोव्यात फक्त एक कोरोनाबाधित रुग्ण आहे आणि 3 एप्रिलनंतर गोव्यात एकही नवीन करोना रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करत दिली आहे.