नारायणगाव – अवैधरित्या कत्तल करण्यासाठी गाई, बैल व वासरे जुन्नर येथे घेऊन जाणाऱ्या तीन जणांवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीर पिरजादे (वय 24, रा. शुक्रवार पेठ, ता जुन्नर), कादिल कुरेशी (वय 32, रा. पनसुबा पेठ, ता. जुन्नर), वाजिद (ता. जुन्नर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा माने (रा. मावळे आळी, नारायणगाव, ता. जुन्नर) याने फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी दि. 18 दुपारी भैरवनाथ मंदिराजवळ महिद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये 1 गावठी गाई, एक बैल, 16 लहान वासरे व 1 मयत झालेले वासरू पकडले.