नवी दिल्ली – लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत सहकार्य केले आहे. मात्र, त्यांनी नक्की किती रुपयांची मदत केली ते मात्र उघड केलेले नाही; परंतु त्यांनी 59 लाख रुपयांचे गुप्तदान केल्याचे आता समोर येत आहे.
देशातील क्रिकेटसह सर्व क्रीडापटूंनी आपापल्या परीने करोनापीडितांसाठी लाखो रुपयांची मदत दिली आहे. गावसकर यांनी मात्र, रक्कम जाहीर केली नव्हती. तरीही त्यांनी केंद्र सरकारला 35 लाख तर, राज्य सरकारला 24 लाख रुपयांचे सहकार्य दिले आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.