सातारा (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयात काल (दि. ९) रात्री उशिरा १२ जणांना तर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात १३ जण अशा २५ संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासात आलेल्या १५ ते २० वयोगटातील १२ सशंयितांना जिल्हा रुग्णालयातील विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
तसेच फलटण उपजिल्हा रुग्णालयात ३ ते ९० वर्ष वयोगटातील १३ जणांना (६ पुरुष व ७ महिला) करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील म्हणून विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
या सर्व २५ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.