लोणी काळभोर-अल्टो कार मधून गावठी हातभट्टीची दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिचा वाहनचालक साथीदार पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ शिवाजी चितारे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून काजल विकी रावळकर (वय 24) हिला अटक करण्यात आली आहे. तिचा साथीदार आतिष सुदेश तमायचीकर (वय 30, दोघे रा. मांजरी, ता. हवेली) हा फरार झाला आहे. कारमध्ये असलेली 13 हजार 650 रूपये किमतीची 455 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व 50 हजार रुपये किमतीची मारुती अल्टो कार असा एकूण 63 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.