पुणे – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या रोगाचे महासाथीत रूपांतर होऊ नये यासाठी सध्या सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरस पासून आपला बाचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणे. तुम्हाला देखील रोगप्रतिकार शक्ती बळकट करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक ज्यूसविषयी सांगणार आहोत. हे ज्यूस घेतल्यास आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवून निरोगी राहू शकता.
सुदृढ आरोग्यासाठी आपण नियमितपणे पालेभाज्या आणि फळे यांचा आहारात समावेश करतो. प्रत्येक पालेभाजीचे काही विशेष फायदे आहेत. तसेच, फळभाज्यांपैकी असणाऱ्या टोमॅटोचे सुद्धा विशिष्ठ फायदे आहेत. चला तर मग पाहूयात काय आहेत टोमॅटोचे फायदे…
आपल्या डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी टोमॅटो लाभदायी आहे. टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. काही जण टोमॅटोचा वापर हा भाज्यांमध्ये करतात किंवा सलाडमध्ये देखील याचा वापर केला जातो.
परंतु टोमॅटोचा रस घेतल्यास तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करू शकता. वास्तविक, टोमॅटोमध्ये आढळणारा ‘फोलेट’ अनेक प्रकारचे संक्रमण रोखण्यात मदत करतो. त्यामुळे टोमॅटोचा रस तुमच्या उत्तम आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतो.
असा केला जातो ‘टोमॅटो’चा रस :
कृती- टोमॅटो चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवा आणि त्याचे लहान तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करा. आता एका वाटीध्ये हा रस काढा आणि वरून मीठ घाला आणि आता आपण ते सेवन करू शकता.