मुंबई : राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचं नियोजन केलं आहे.
वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात ५-७ टक्के, व्यावसायिक दरात १०-१२ टक्के आणि औद्योगिक दरात १०-११ टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. नवे दर १ एप्रिल २०२० पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.