कोरोनाच्या संकटाला सर्वजण मिळून सामोरे जाऊ – बी. जे. देशमुख
पुणे : शहराचा धान्य आणि भाजीपाला पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मार्केट यार्ड सुरू ठेवूया आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन करोनाच्या आव्हानाला सर्वजण मिळून सामोरे जाऊया, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी केले आहे .
करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन, कामगार संघटना आणि भुसार बाजारातील दि पूना मर्चंटस चेंबरने बुधवारपासून मार्केट यार्ड बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी बाजार सुरू ठेवण्याचे आवाहन अडते आणि कामगार यांना केले आहे.
अन्यथा शहराच्या धान्य आणि भाजीपाला पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल. यासाठी बाजार सुरू ठेवूया असेही त्यांनी म्हटले आहे.