मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ऐतिहासिक “पृथ्वीराज’ चित्रपटातून अक्षय कुमारसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात मानुषी छिल्लर ही संयोगिताची भूमिका साकारणार आहे. मानुषी छिल्लर म्हणाली, “पृथ्वीराज’ या चित्रपटातील अभुनव माझ्यासाठी खरोखरच खूप मोठा आहे. यासाठी संपूर्ण टीमने जोरदार तयारी केली असून राजस्थानमधील शूटिंगही आम्ही पूर्ण केले आहे.
या राज्यात शूटिंगचा अनुभव उत्कृष्ट होता. कारण आम्ही येथे काही अतिशय नेत्रदीपक देखावे चित्रित केले आहेत. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी हे माझे पहिले आउटडोर होते आणि या संपूर्ण अनुभवाने मी मोहित झाली आहे.
मानुषी छिल्लर म्हणाली, राजस्थानमध्ये शूटिंग करताना आम्हाला खूप प्रेम मिळाले. पृथ्वीराज आणि संयोगिताबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप आदर आहे आणि ते पाहून आम्ही रोमांचित झालो. अशा परिस्थितीत, संयोगिताची भूमिका पडद्यावर साकारणे ही माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. मी माझ्या परीने संपूर्ण प्रयत्न करत आहे.
दरम्यान, चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारत आहे. पृथ्वीराज चौहान अजमेरचे राजा सोमेश्वर चौहान यांचे पुत्र होते. पृथ्वीराज यांनी वयाच्या 13व्या वर्षीच अजमेरची राजगादी सांभाळली होती.