नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार सुरेश प्रभू हे खबरदारीचा उपाय म्हणून पुढच्या 14 दिवसांसाठी घरीच “विलगीकरणात’ राहणर अहेत. या महिन्यात 10 मार्च रोजी सौदी अरेबियामध्ये एका बैठकीसाठी प्रभू गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांची करोना विषाणूबाबतची चाचणी घेण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र त्यानंतरही प्रभू यांनी स्वतः हून विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
तत्पूर्वी केंद्रीय राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही “सेल्फ क्वारंटाईन’ राहण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडेच एका वैद्यकीय संस्थेला त्यांनी भेट दिली होती. त्या संस्थेमध्ये करोना विषाणूची लागण झाल्याचे प्रकरण निष्पन्न झाले आहे. या संस्थेला भेट दिल्यानंतर मुरलीधरन यांचीही टेस्ट निगेटिव्ह आली होती.
देशभरात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 147 झाली आहे.