सोमेश्वरनगर (बारामती) : सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकड़े महाविद्यालयात क्षमता व कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी (दि. ११ मार्च) योगा आणि शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्याची जाणीव या कार्यशाळेमध्ये योगतज्ञ डॉ. सुधीर साळवे यांनी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना दैनदिन जीवनामध्ये योगाचे महत्व पटवून सांगितले.
त्याचबरोबर त्यांनी आसनाचे प्रात्यक्षिक दाखवून त्या आसनांमुळे आपल्याला आरोग्य सुदृढ ठेवण्यास कशी मदत होते,तसेच आपल्या शरीरातील पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था यांचे कार्य उत्तम चालण्यासाठी योगासनांचा कसा उपयोग होतो. याविषयी माहिती सांगून त्यांनी जीवनशैली सुधारण्यास व आनंदी जीवन जगण्यासाठी प्राचीन काळापासून योगा मानवी जीवनामध्ये किती आवश्यक आहे. तसेच निरनिराळया आसनाचे फायदे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये टी. सी. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.
गौतम जाधव यांनी शारिरीक तंदुस्ती आणि आरोग्याची जाणीव या विषयावर मार्गदर्शन करताना जागतिक आरोग्य संघटनेचा दाखला देऊन शारीरिक तंदुरूस्ती म्हणजे नेमके काय तसेच शारीरिक तंदुरूस्तीचा आपल्या आरोग्याशी दैनंदिन जीवनशैलीशी किती घनिष्ट संबंध आहे. या विषयी मार्गदर्शन करतानाच प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार क्षमतेनुसार व्यायाम कसा कराय व शरीर तंदुरुस्त कसे ठेवावे याबददल त्यांनी आवाहन केले.
प्रत्येकाने नियमीतपणे व्यायाम केला पाहिजे त्याचबरोबर व्यायाम करताना थकवा येउ नये म्हणून दररोज वेगवेगळा सायकलिंग पोहणे, टेकडी चढणे-चालणे, हळूहळू धावणे, मैदानी खेळ खेळणे असे विविध प्रकारचे व्यायाम करावेत. त्यामध्ये व्यायाम करताना कंटाळा येणार नाही. पाच किंवा दहाजण असा गटाने व्यायाम केला तर नियमीत व्यायाम होण्यास मदत होईल त्याचबरोबर त्यांनी संतुलित आहार घ्यावा याबददल मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे सर यांनी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी यांच्यामध्ये व्यायामाची योगाची आवड निर्माण होऊन त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ निर्माण होण्यास मदत होईल यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कार्यशाळेचे आयोजन शारिरिक शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी केले होते. आभार समन्वयक डॉ. संजू जाधव यांनी मानले.