महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार; महापौर निधीतून उपलब्ध केला निधी
पुणे : पुणे महापालिकेच्या डॉ. नायाडू सांसर्गिक रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला असून २ बेड्स तातडीने कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच लवकरच आणखी ४ बेड्स उपलब्ध होत असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ससून रुग्णालयाच्या सहकार्यातून महापालिकेने हा विभाग सुरू केला आहे.
नायडू सांसर्गिक रुग्णालयात अतिदक्षता विभागात लवकरच सुरू करणार अशी घोषणा महापौर मोहोळ यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. त्यावर तातडीने पावले उचलत अतिदक्षता विभागाचे ६ बेड्स सुरू करण्यात येत आहेत. सांसर्गिक रोगांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून यामुळे खासगी रुग्णालयात उपचारांसाठी जाण्याची गरज पडणार नाही.
या संदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, डॉ. नायडू सांसर्गिक रोगांच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची अत्यंत तातडीची गरज होती. त्याच अनुषंगाने महापौर निधीच्या माध्यमातून यासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला जात आहे. ५,२,२ अनव्ये प्रक्रिया करून तातडीने अतिदक्षता विभाग केले जात आहेत. तातडीच्या स्वरूपात हा विभाग सुरू व्हावा, यासाठी आम्ही ससून रुग्णालयाची मदत घेतलेली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता २ बेड्स लगेचच उपलब्ध झाले आहेत’.