नवी दिल्ली – दिल्ली सरकारने देशद्रोहाच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी टि्वट करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. जीतकर हारनेवाले को केजरीवाल कहते हैं, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हार कर जीतने वाले को बाज़ीगर कहते है,
लेकिन जीत कर हारने वाले को केजरीवाल कहते है: https://t.co/RzfZSOOSbB
Aur yeh bhi! https://t.co/smtFdSyFEI
फायदा हो जिधर, वो उधर की और चलेगा
अब पाँच साल #AAPka यही दौर चलेगा
शाह केजरीवाल ? Ohh Sorry वाह केजरीवाल!— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 29, 2020
शशी थरूर यांनी टि्वट केले आहे की,’हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं, लेकिन जीतकर हारने वाले को केजरीवाल कहते हैं. इथेच न थांबता थरुर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केजरीवाल यांच्या भेटीवरही भाष्य केले. आता पाच वर्षे आपचे (आम आदमी पार्टी) असेच चालणार. शहा केजरीवाल (ओह सॉरी) वाह केजरीवाल !, अशी टिप्पणी थरूर यांनी केली.