ख्राइस्टचर्च : सलामीवीर पृथ्वी शाॅ,चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरूध्दच्या दुस-या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ६३ षटकात सर्वबाद २४२ धावा केल्या आहेत.
India all out for 242 batting first at Hagley Oval. Boult takes the final wicket bowling Shami for 16. Kyle Jamieson with his maiden 5 wicket haul in Test cricket. Finishes with 5-45. Southee 2-38 Boult 2-89 Wagner 1-29 LIVE scoring | https://t.co/z3Er2dXVK3 #NZvIND pic.twitter.com/Be7Lz5Qv67
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 29, 2020
न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघास विजय आवश्यक आहे.
New Zealand have won the toss and they will bowl first in the 2nd Test.#NZvIND pic.twitter.com/YjiGwdj8a7
— BCCI (@BCCI) February 28, 2020
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना शाॅच्या ५४, पुजाराच्या ५४ आणि विहारीच्या ५५ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद २४२ अशी मजल मारली.
मंयक अग्रवाल (७), विराट कोहली(३), अजिंक्य रहाणे (७) आणि रिषभ पंत(१२) हे पुन्हा एकदा अपयशी ठरले. जडेजाने ९,शम्मीने १६ आणि बुमराहने नाबाद १० धावा केल्या.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काइल जेमिसनने ४५ धावांत सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर टिम साउदी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ गडी बाद केले. नील वॅगनर याने २९ धावा देत १ गडी बाद केला.