लुझहौ : तोंड झाकणारा मास्क न मिळाल्याने एका महिलेने चक्क जिराफाची वेश परिधान केला. या महिलेने जिराफाचा पूर्ण शरीराला झाकणारा वेश घातला होता.
आपल्या कुटुंबियांसाठी औषधे घेण्यासाठी ही महिला आली होती. लुझहौ येथील रुग्णालयात आलेल्या या महिलेचा व्हिडिओ समाजमाध्यामांत खूपच लोकप्रिय झाला आहे. रस्त्यावरून जिराफाचा वेश घालून ही महिला चालत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या वेशभूषेच्या छोट्याशा प्लास्टिकची छिद्रे पाहण्यासाठी केली आहेत.
माझा जुना मास्क फाटला होता. तो मुदती आधी फाटला. त्यानंतर दुसरा मास्क मला मिळाला नाही. मास्क विक्रीसाठी उपलब्धच नव्हते. त्यामुळे हा वेश घालून औषधे आणण्यासाठी जाण्यावाचून पर्याय नव्हता, असे या महिलेने सांगितले.
दरम्यान अशा वेशभूषेमुळे कोरोनापासून वाचता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापुर्वी पाण्याचे जग, प्लास्टिकच्या बाटल्या, हेल्मेटचा कोरोनापासून वाचण्यासाठी वापर केलेली छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.