हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे महरौलीचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. यादव जेव्हा मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते, तेव्हा त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अशोक मान यांचा मृत्यू झाला आहे तर अन्य एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Delhi: Shots fired at Aam Aadmi Party (AAP) Mehrauli MLA Naresh Yadav’s convoy while he was coming back from temple. One party volunteer lost his life while another has been injured in the incident. pic.twitter.com/QdpM5wPfQt
— ANI (@ANI) February 11, 2020
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर आमदार नरेश यादव हे मंदिरात गेले होते. त्यांनतर तेथून ते परतत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार यादव म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. मला हल्ल्याचे कारण माहिती नाही, परंतु हा अचानक करण्यात आलेला हल्ला आहे.
जवळपास चार राउंड फायर करण्यात आले. ज्या वाहनात मी होतो, त्यावर हल्ला करण्यात आला. मला विश्वास आहे की जर पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला तर हल्लेखोरास ओळखता येईल. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी देखील एका मृत्यूच्या वृत्ताबाबत दुजोरा दिला आहे. नरेश यादव यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कुसुम खत्री यांचा 18161 मतांनी पराभव केला आहे. नरेस यादव यांना 62417 मते मिळाली आहेत.