नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक दिवसानंतर निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी जाहीर केली. दिल्ली निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की दिल्लीत 62.59 टक्के मतदान झाले आहे. बल्लीमारान जागेवर सर्वाधिक म्हणजे 71.61 टक्के मतदान झाले तर सर्वाधिक कमी मतदान दिल्ली कॅंटोन्मेंटमध्ये 45.4 टक्के मतदान झाले.
Delhi Chief Electoral Officer Ranbir Singh: The highest voter turnout was recorded in Ballimaran assembly constituency at 71.6 per cent while the lowest voter turnout was recorded in Delhi Cantonment at 45.4 per cent. #DelhiAssemblyPolls https://t.co/NqTjxuo0qQ
— ANI (@ANI) February 9, 2020
आम आदमी पक्षाच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने हि आकडेवारी जाहीर केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदानाची टक्केवारी घोषित करण्यास उशीर का होतो आहे असा सवाल उपस्थित केला होता. निवडणूक आयोग काय करीत आहे? मतदान संपल्यानंतरही आयोग टक्केवारीचे का घोषित करीत नाही असे ट्विट केलं होत.
दरम्यान शनिवारी दिल्ली विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील आरोगाने आकडेवारी घोषित केली नव्हती. मतदान झाल्यानंतर आयोगाने आज आकडेवारी घोषित केली.