केसनंद-राहु रोडपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण सुरू ः वाहतूक कोंडीपासून मुक्तता
वाघोली -श्रेयस मंगल कार्यालय वाघोली ते कोलते बिल्डिंग केसनंद-राहु रोडपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून रखडलेला रस्ता आता वाघोलीतील वाहतूक कोंडी मुक्तीचा पर्याय बनला आहे.
माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र, सातव पाटील यांच्या प्रयत्नाने याठिकाणी रस्त्याचे वारंवार डागडुजी क रण्यात आली होती. पुणे-नगरकडून केसनंद राहु रोडकडे जाण्यासाठी असणारा हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. पण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त होते.
वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या मालती गोगावले, जयश्री काळे, संदीप सातव यांच्या पाठपुराव्याने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण झाल्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली असून या रस्त्यावरून नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे.
वाघोली येथील पीएमपीएलच्या बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहे, अंतर्गत रस्ता करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. हा परिसर जर विकसित झाला की, हा भाग वाहतूक कोंडी मुक्तीचा अनोखा पर्याय ठरू शकतो.
गणेश गोगावले, सामाजिक कार्यकर्ते, वाघोली