बरेली : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीने मुलाच्या चेहऱ्यावर ब्लेडने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. सदरील मुलींला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बालसुधारगृहात पाठविले आहे.’तो सुंदर दिसतो याचा त्याला गर्व होता म्हणून मी त्याला विद्रूप केले’, असे त्या मुलीने हल्ल्यानंतर पोलिसांना सांगितले.
सदरील मुलीचे त्याला प्रपोजही केले होते, मात्र मुलाने तिच्या प्रेमाला नकार दिला होता. ‘मला अभ्यासात लक्ष द्यायचे आहे. प्रेम करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही अशा स्पष्ट शब्दात त्याने तिला सांगितले होते.
मुलाने नकार दिल्यामुळे मुलगी रागावली. तिने अनेकदा मुलाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तरीही तिला मुलाने कंटाळून सांगितले मी तुझ्यापेक्षा सुंदर आहे, त्यामुळे आपल्यात काहीच होऊ शकत नाही.
तिला असं बोलल्यावर मुलाचा फारच राग आला. तिने कॉलेज बाहेर पडताच मुलाच्या चेहऱ्यावर ब्लेडने सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल आले, असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.