मुंबई : कर्णधार विराट कोहलीने माझ्या तंदुरस्तीवर नाराजी व्यक्त करताना संघातील स्थान टिकवण्याची खात्री दिली नव्हती. मात्र त्याची टीका मी सकारत्मकतेने घेतली व तंदुरस्तीवर भर दिला.
त्यामुळेच मुंबई संघासह इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मला संधी मिळाली आहे, असे मत सर्फराज खान याने व्यक्त केले आहे. सर्फराजला तंदुरस्ती अभावी राॅयल चॅलेंजर्स संघातून वगळण्यात आले होते. सर्फराज आता किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, सर्फराज खानने रणजी ट्रॉफीत मुंबई संघाकडून खेळताना या हंगामात दोन डावात आतापर्यंत ५२७ धावा केल्या आहेत. यात एका त्रिशतकासह द्विशतकाचा समावेश आहे. दोन्ही वेळा तो नाबाद राहिला आहे.