जामखेड : तालुक्यातील माळेवाडी येथे माऊली हॉस्पिटल पाटोदा यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. सदरील शिबिरामध्ये निमिया, जुनाट त्वचारोग, मुळव्याध, दमा इत्यादी आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच रक्त तपासणी, साखरेची तपासणी, रक्तगट, कॅल्शियम आदी मोफत तपासण्या करण्यात आल्या.
आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आरोग्याची हेळसांड होत आहे. कोणीही आरोग्याकडे लक्ष देत नाही. विशेषतः महिलामध्ये हिमोग्लोबीन कॅल्शियम लोह यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असते. ग्रामीण भागांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. रक्त तपासणी चे खर्च जास्त होत चालल्यामुळे महिला चाचण्या करत नाहीत, म्हणून माऊली हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले होते.
डॉ. सारीका माने यांनी अंत्यंत गरीबी परीस्थीमध्ये जाण आसल्यामुळे पाटोदा येथे स्वतःचा माऊली हॉस्पीटल सुरु केले. ग्रामीण भागामध्ये लोकांना आर्थिक परिस्थीमुळे ओषध उपचार मिळत नाहीत म्हणुन त्या ग्रामीण भागामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेत आहेत.