लखनौ : प्रसिद्ध स्टॅन्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे नवा वाद उफाळून येण्याची चिन्हं आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कॉमेडियन कामरा यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये ते एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचे संपादक व वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांना काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. या व्हिडिओमधील दृश्यांवरून सदर व्हिडीओ विमान प्रवासादरम्यान चित्रित केल्याचं निदर्शनास येत असून कामरा यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नास अर्णब गोस्वामी उत्तर देताना दिसत नाहीयेत.
दरम्यान, कुणाल कामरा यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये कामरा अर्णब गोस्वामींना चर्चेसाठी आव्हान देतायेत मात्र अर्णब काहीही न बोलता विमानातील आसनावर बसून आहेत. या व्हिडिओमध्ये कामरा अर्णब यांना उद्देशून, ‘अर्णब तुम्ही पत्रकार आहात, राष्ट्रवादी आहात की भ्याड आहात? उत्तर द्या!’ असे उद्गार काढत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, कामरा यांनी या घटनेबाबतचं संपूर्ण कथानक देखील ट्विट केलं असून या ट्विटमध्ये कुणाल कामरा यांनी, ‘मी आज अर्णब गोस्वामींशी लखनौकडे निघालेल्या फ्लाईट दरम्यान प्रथम उड्डाणापूर्वी व नंतर फ्लाईट उतरल्यानंतर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपण व्यस्त असल्याचे भासवत मला टाळले. त्यानंतर नाईलाजाने मला ज्या प्रमाणे अर्णब गोस्वामींच्या चॅनेलचे पत्रकार इतरांना प्रश्न विचारतात त्याचप्रमाणे गोस्वामींना प्रश्न चिरावे लागले.’ असा दावा केला आहे.
I did this for my hero…
I did it for Rohit pic.twitter.com/aMSdiTanHo— Kunal Kamra (@kunalkamra88) January 28, 2020