नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशात लागू झाला आहे. अनेक ठिकाणी निषेधही होत आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर रविवारी जामिया मिलिया इस्लामिया येथे नागरिकत्व कायद्याबद्दल विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी गेले होते. मात्र जामियात पोहोचण्यापूर्वी थरूर ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागला.
त्यांनी आपली कार सोडून पायी जात जामिया विद्यापीठ गाठले.जामिया विद्यापीठात संबोधित करताना थरूर म्हणाले की, सीएए कायदा लोकशाही विरोधी असून भेदभाव करणारा कायदा आहे.
भारतीय लोकशाहीवरील हा सर्वात मोठा डाग आहे. अलीकडेच जामियामध्ये नागरिकत्व कायद्याच्या विरोधात हिंसाचार होता. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते .
शाहीन बागेत निदर्शने सुरू
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) च्या विरोधात राजधानी दिल्लीतील शाहीन बाग भागात सुमारे महिनाभरापासून कायद्याचा निषेध सुरू आहे. शाहीन बागेत बीच रोडवर आंदोलनकर्ते 24 तास निदर्शने करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक महिनाभरापासून बंद आहेत. सरकार जोपर्यंत नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता मोकळा करणार नाही असे निदर्शकांचे म्हणणे आहे.
मार्ग खुला करावा या मागणीसह रॅली
शाहीन बागेत सुरू असलेल्या निषेधामुळे दिल्ली ते नोएडा हा रस्ता बंद आहे. हा रस्ता सुरू करण्याच्या मागणीसाठी रविवारी सरिता विहारच्या लोकांनी मोठा मोर्चा काढला. निषेधामुळे रस्ता बंद झाल्यामुळे या लोकांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याचे या लोकांचे म्हणणे आहे.