पारगाव शिंगवे – येथील भैरवनाथ महाराज मंदिरातील दान पेटी फोडून 10 हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे, ही घटना सोमवारी (दि. 30) मध्य रात्रीच्या सुमारास घडली. या मंदिरात व मंदिराच्या सर्व बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
अज्ञात चोरट्यानी रात्रीच्या वेळी मंदिराच्या पाठीमागील बाजूने प्रवेश करुन पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला. दान पेटीचे कुलूप तोडून त्यामधील अंदाजे 10 हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली.
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पुजारी रामचंद्र राजगुरू देवाची पुजा व महाआरतीसाठी मंदिरात आले. त्यावेळी मंदिरात प्रवेश केल्यावर दानपेटीचे कुलूप व मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पोलीस पाटील गणेश पंडित यांना माहिती दिली. यावेळी ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.