नवी दिल्ली : भारतीय महिला हाॅकी संघाची बचावपटू आणि माजी कर्णधार सुनीता लाक्रा हिने आंतरराष्ट्रीय हाॅकीतून गुरूवारी निवृत्ती जाहीर केली. २०१८ च्या एशियन गेम्स स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाची सदस्य असलेल्या सुनिताने गुडघ्याच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे.
☑ Asian Games
☑ Olympics
☑ World CupSeen it all, done it all. 👏🙌
Thank you for everything, Sunita. We wish you a happy retirement.
Read more: https://t.co/1poxirk0S5#IndiaKaGame @IndiaSports @CMO_Odisha @sports_odisha @Media_SAI @FIH_Hockey pic.twitter.com/hnrDGXt7iV
— Hockey India (@TheHockeyIndia) January 2, 2020
२८ वर्षीय सुनिताने म्हटले आहे की, ” गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यावर पुन्हा शस्ञक्रिया करावी लागणार आहे. २०१६ च्या रिओ आॅलिंपिकमध्ये खेळण्याची मला संधी मिळाली, त्याबदल मी स्वत:ला भाग्यशाली समजते. गुडघ्याच्या दुखापतीमधून कधी सावरणार, हे निश्चित नाही. टोकियो आॅलिपिंकसाठी संघाला माझ्याकडून शुभेच्छा.”
या निर्णयामुळे तिचे या वर्षीच्या टोकियो आॅलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. लाक्रा ही २००८ पासून भारतीय संघाची सदस्य असून ती भारताकडून १३९ आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. २०१४ मध्ये भारताने एशियन गेम्समध्ये ब्राँझपदक जिंकले होते त्या संघात सुनिताचा समावेश होता तर २०१८ च्या एशियन चॅम्पियन ट्राफीमध्ये भारताने रौप्यपदक पटकावले होते, त्यावेळी तिने संघाचे नेतृत्वही केले आहे.
दुखापतीतून सावरल्यानंतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्याचा मानस असल्याचे तिने सांगितले असून याबरोबरच तिने भारतीय संघातील सहकारी, हाॅकी इंडिया आणि प्रमुख प्रशिक्षक सोर्ड मारिने यांचे आभार देखील मानले आहेत.