अभिनेत्री सनी लियोनी भारतात आल्यानंतर सतत चर्चेत राहिलेली आहे. कधी काळी पॉर्न स्टार असलेली सनी लियोनी केवळ आपल्या चित्रपट आणि फॅशन सेंसच नव्हे, तर सोशल मीडियावरील मजेदार व्हिडिओमुळेही चर्चेत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्याचे झाले असे की, सनी लियोनी एका इव्हेंटसाठी गेली होती. यावेळी इव्हेंटच्या होस्टने सनी लियोनीला सनी देओलचा डायलॉग म्हणण्यास विनंती केली. तेव्हा सनी लियोनी “दामिनी’ चित्रपटातील “ये ढाई किलो का हाथ जब किसी पर पडता है, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है’ हा डायलॉग म्हणाली. यानंतर उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हास्यकल्लोहळ उडाला.
वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सनी ही टीव्ही रिऍलिटी शो “स्प्लिट्सविला’मध्ये होस्ट करताना झळकली होती. तसेच ती “वीरमादेवी’ या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ज्यात तिच्यासोबत नवदीप मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तमिळशिवाय हिंदी, मलयालम, कन्नड आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.