श्रीनगर – काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हिमस्खलनाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जवान मरण पावले. कुपवाडा जिल्ह्यामधील तंगधर भागातील लष्कराच्या ठाण्यावर मंगळवारी दुपारच्या सुमारास हिमस्खलन झाले. त्यामध्ये किमान 4 जवान गाडले गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापैकी तिघा जवानांचे मृतदेह आज (बुधवारी) सापडले तर एका जवानाला जिवंत वाचवण्यात यश आले आहे.
हिमस्खलनाच्या दुसऱ्या घटनेमध्ये बंडिपोरा जिल्ह्यातील गुरेझ भागातील दावर इथे लष्कराचे गस्तपथक बर्फाच्या कड्याखाली गाडले गेले. त्यामध्ये दोन जवान गाडले गेले. त्यापैकी एकाला जिवंत वाचवण्यात यश आले. तर शोधमोहिमेदरम्यान दुसऱ्या जवानाचा मृतदेह सापडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.