काबुल : अफगाणिस्तानातल्या उत्तर कुंडूज प्रांतात काल तालीबान्यांनी पेरलेल्या भुसुरुंगावरुन वाहन गेल्याने झालेल्या स्फोटात 8 मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याचे अफगाणी गृहमंत्रालयाचे प्रवक्ते नसरत रहिमी यांनी सांगितले.
काही तासांनंतर सुरक्षा चौक्यावर गोळेबार आणि स्फोटात कमीतकमी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, असे उत्तर सारी पुल प्रांतातील पोलिस प्रवक्ता मोहम्मद नूरघा फैजी यांनी सांगितले. स्फोटके असलेल्या वाहनातून आलेल्या दहशतवाद्यांना चेकपॉईंटवर रोखण्यात आले होते, त्यानंतर त्यांनी पळ काढण्यासाठी गोळीबार केला, असे ते म्हणाले.
त्यांनी दूर अंतरावर गेल्यावर रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने स्फोटकांचा स्फोट केला असे फैझी म्हणाले. या दोन्ही हल्ल्यांमागे तालिबान असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र तालिबानकडून या संदर्भात कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
या भागात तालिबानी दहशतवादी आणि अमेरिकन पाठिंबा असलेल्या अफगाणी सैन्यात नेहमीच चकमकी होत असतात. तालिबानी बंडखोरांनी 2015 मध्येही या भागावर हल्ला केला होता.