सिनेसृष्टीत घराणेशाहीचा वारसा घेऊन आलेले अनेक जण आहेत. त्यामुळेच इथे आघाडीच्या कलाकारांमध्ये अनेक जण भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ किंवा बहिणी-बहिणी अशा नात्यात असल्याचे दिसतात. अपारशक्ती खुराणा-आयुष्मान खुराणा, शिल्पा शेट्टी कुंद्रा-शमिता शेट्टी, सैफ अली खान-सोहा अली खान, फरहान अख्तर -जोया अख्तर अशी अनेक नावे आपल्याला सांगता येईल. या “बंधुभावा’वर टाकलेला दृष्टिक्षेप.
बॉलीवूडमध्ये एखादा कलाकार अन्य कलाकाराचा नातेवाईक किंवा भाऊ-बहीण निघतो, तेव्हा त्याच्या लोकप्रियतेत आणखीच भर पडत जाते. तो कलाकार आपल्या गुडबुक्समध्ये सामील होतो. रक्ताचे नाते असो किंवा अन्य कोणतेही नातं असले तरी आपला कलाकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन लगेचच बदलतो. उदा. गोविंदाचा भाचा विनोदी कलाकार कृष्णा. हा फार प्रभावी ठरला नसला तरी गोविंदामुळे त्याच्याविषयी आपल्या मनात सॉफ्टकॉर्नर असतो. अपारशक्ती खुराणा-आयुष्मान खुराणा, शिल्पा शेट्टी कुंद्रा-शमिता शेट्टी, सैफ अली खान-सोहा अली खान, फरहान अख्तर -जोया अख्तर अशी अनेक नाव आपल्याला सांगता येतील. आतापर्यंत आपण अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सिबलिंग्जला पडद्यावर पाहिले असेल आणि तेही वेगवेगळे. एवढेच नाही तर काहींना तर एकत्र पाहिले असेल. हे दृष्य प्रेक्षकांसाठी रोमांचक असते. बहीण-भावाची जोडी किती हिट होईल, हा आगामी काळच सांगेल.
भाऊ-बहिणीची हिट जोडी
भाऊ-बहिणीचे नाते अतिशय घट्ट आणि प्रेम असते. भांडण, वाद-प्रतिवाद, प्रेम, लाड असे सर्व घटकांचे मिश्रण या नात्यात असते. लहानपणा, मोठेपणा याचा अनोखा संगम यात पाहावयास मिळतो. प्रत्यक्षात प्रेमळ असणाऱ्या भाऊ-बहिणीचे नाते हे पडद्यावर पाहणे देखील सुखद ठरते. आपण जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीची गोष्ट करतो, तेव्हा या गोष्टींचे गॉसिपिंग होऊ लागते. त्याला वेगळे वळण मिळते आणि त्यांचे प्रेमकहाण्या आणि लेटेस्ट डेटिंगवर चर्चा होऊ लागते. आता आपण हॉट सेलिब्रिटी सिबलिंगशी चर्चा करु. ते दोघेही प्रसिद्धीला जोडलेले असतात.
प्रियांका चोप्रा-परिणिती चोप्रा
देश-परदेशात या भगिनींना कोण ओळखत नाही. दोघी बॉलीवूडच्या प्रसिद्ध नायिका आहेत. त्याचबरोबर बहिणी असल्या तरी दोघात एकमेकीबद्धल प्रचंड प्रेम आहे. देसी गर्ल आणि परी या एकमेकासमवेत बराच वेळ घालवतात. याची प्रचिती आपल्याला सोशल मीडियावरून येते. या दोघी आता प्रथमच फ्रोजन-2 मध्ये एकत्र दिसणार आहेत. हा ऍनिमेटेड चित्रपट असणार आहे. यात प्रियांका ही एल्सा आणि परिणिती ऍनाच्या भूमिकेला आवाज देत आहे. म्हणजेच या पात्रांना दोघींनी आवाज दिला आहे.
सलमान खान-अर्पिता खान
सलमानची ओळख सांगायची गरज नाही. अर्पिता मात्र बॉलीवूडमधून आलेली नाही. मात्र ही जोडी बॉलीवूडच्या लोकप्रिय भाऊ-बहिणीपैकी एक. दोघात पवित्र नाते असून त्याचे कथन शब्दांत करता येणार नाही.
आलिया भट्ट-पूजा भट्ट
पूजा आणि आलिया या दोघी बहिणी बॉलीवूडच्या नामांकित कलाकार आहेत. 1990 च्या दशकात पूजा भट्टने बॉलीवूडमध्ये राज्य केले होते. आज तिची बेबी सिस्टर आलिया भट्टचा बोलबाला आहे. दोघीही प्रस्थापित कलाकार आहेत. दोघी आता महेश भट्टचा चित्रपट सडक-2 मध्ये दिसणार आहेत. हा सडक चित्रपटाचा सिक्वेल आहे. पोस्टर आणि सोशल मीडियावर सडक-2 चे छायाचित्र व्हायरल झाले आहे. पूजा भट्ट ही आलिया भट्टची मोठी बहीण आहे. पडद्यावर बहिणी-बहिणीची जोडी श्रोत्यांच्या पसंतीस पडेल, अशी आशा केली जात आहे.
श्रद्धा कपूर-सिद्धांत कपूर
या दोघांना आपण अनेकदा पाहिले, मात्र वेगवेगळे. श्रद्धा आणि सिद्धांत सेलेब सिब्लिंग आहेत. दोघेही स्पॉटलाइटपासून दूर आहेत. दोघांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सना माहिती मिळत राहते. या दोघांत घनिष्ट नाते आहे. श्रद्धा आणि सिद्धांतला हसिना पारकर या चित्रपटात एकत्र पाहिले आहे.
आदित्य रॉय कपूर-कुणाल रॉय
आदित्य आणि कुणाल या भावांची घराघरात चर्चा आहे. दोघांसाठी यह जवानी है दिवानी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. कुणालच्या खात्यात चित्रपट लॉयन्स ऑफ पंजाब प्रीजेंट, दिल्ली बेल्ली आणि ऍक्शन जॅक्सनचा समावेश आहे. त्याचवेळी आदित्यने फॉलोअरची संख्या वाढविली. आशिकी-2, फितूर, ओके जानू आणि कलंकमधून श्रोत्यांना आकर्षित केले.
साजिद खान-फराह खान
दोघांनीही अनेक ब्लॉक ब्लस्टर चित्रपट दिले आहेत. बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय बहीण-भावाची जोडी म्हणून याकडे पाहिले जाते. अडचणीच्या काळात ते दोघे एकमेकांना खंबीरपणे साथ देतात.
रणबीर-करीना-करीष्मा कपूर
बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबीयाना मोठे वलय आहे. कपूर घराण्यातील प्रत्येक व्यक्ती बॉलीवूडमध्ये स्टार-सुपरस्टार ठरला आहे. नव्या पिढीतील रणबीर, करिना आणि करिष्मा कपूरनी बॉलीवूडमध्ये दबदबा निर्माण केला आहे. तत्पूर्वी राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर, कुणाल कपूर या मंडळींनी बॉलीवूडला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.
फरहान अख्तर-जोया
बॉलीवूडमधील ही बहीण-भावाची जोडी सर्वात प्रतिभासंपन्न म्हणून ओळखली जाते. दोघेही महान दिग्दर्शक म्हणून सिद्ध झाले आहेत. या दोघांनी एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती केली आहे. फरहान तर उत्तम अभिनेता आहे. जोया अख्तर दिग्दर्शन क्षेत्र हाताळते.
सैफ अली खान-सोहा अली खान
सैफ अली खान आणि सोहा अली खान हे सख्खे भाऊ-बहीण आहेत. दोघांत अतिव प्रेम आहे. कोणत्याही वादात ते एकमेकांची पाठराखण करतात. मात्र ते आपले प्रेम सार्वजनिक करत नाहीत. असे असले तरी दृष्ट लागल्याशिवाय राहात नाही.
अभिषेक बच्चन-श्वेता बच्चन
ही भावंडं खरोखरच एकमेकांसाठी बनलेली आहेत. दोघेही पवित्र नात्यांनी एकमेकांशी जोडलेले आहेत. सुखदु:खात दोघांना एकत्र पाहिले आहे. असे प्रेम आजकाल क्वचित पाहावयास मिळते. अर्थात श्वेताने चित्रपटाची पायरी चढलेली नाही.
हुमा कुरेशी-साकिब: हुमा आणि साकिब ही बॉलीवूडची नवीन भावंडांची जोडी आहे. दोघेही नॉन फिल्मी पार्श्वभूमीतून आले आहेत. या दोघांनी चांगली मेहनत घेतल्यानेच त्यांना बॉलीवूडमध्ये स्थिरावण्याची संधी मिळाली. या दोघांनी प्रवाल रमनचा दोबारा आणि सी युवर एव्हिलमध्ये काम केले आहे.
अर्जुन कपूर-सोनम कपूर
वास्तविक अर्जुन कपूर आणि सोनम कपूर हे चुलत भाऊ-बहीण आहेत. सोनम कपूर ही अनिल कपूरची तर अर्जुन कपूर हा बोनी कपूरचा मुलगा. सोनम ही टॉप फॅशनिस्ट म्हणून ओळखली जाते. त्याचवेळी भाऊ बॉलीवूडचा प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळखला जातो.
बहिणींची धमाल
आपण हिंदी चित्रपटात भाऊ-बहिणींना अनेकदा पाहिले असेल आणि कौतुकही केले असेल. त्याचवेळी खऱ्या बहिणींचा देखील जलवा आहे. नूतन-तनुजाचा अभिनय सर्वांनीच पाहिला आहे. आतापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक बहिणी आल्या. काही वेळेस हिट ठरल्या तर काही वेळेस फ्लॉप. असे असताना या भगिनीनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची संख्या वाढविली. अक्षरा श्रुती हसन, करिष्मा-करिना, अमृता आणि मलायका आरोरा, ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना, नूतन-तनुजा, शिल्पा-शमिता शेट्टी, शिल्पा-नम्रता शिरोडकर, सुषमा-समीरा रेड्डी, रायमा आणि रिया सेन. काजोल आणि राणी मुखर्जी कझिन सिस्टर्स आहेत. या दोघींनी दमदार चित्रपट दिले आहेत. काजोलच्या बाजीगर, यह दिल्लगी, करण-अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, इश्क याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचवेळी राणीने गुलाम, कुछ कुछ होता है, साथीया, चलते चलते, हम तुम आदी सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले.
रियल ब्रदर्स लव्ह
बॉलीवूड इंडस्ट्रीत दरवर्षी दीड हजार चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र, या ठिकाणी कनेक्शन असणे गरजेचे नाही. जेव्हा कनेक्शन असते, तेव्हा त्याचा बोलबाला होतो. या क्रमवारीत अनेक नावे आहेत आणि ते हिट ठरले आहे. शाहिद कपूर, इशान खट्टर, रघु राम -राजीव लक्ष्मण, अभिषेक-सिद्धार्थ निगम, लव-कुश सिन्हा, इमाद-विवान शहा, विकी-सनी कौशल, आमिर-फैजल खान, अनिल कपूर-संजय कपूर, सलमान-अरबाज-सोहेल, राहुल-अक्षय खन्ना, सनी -बॉबी देओल या भावांच्या जोड्या प्रसिद्ध ठरल्या.
चित्रपटापासून दूर पण प्रसिद्ध
दीपिका पदुकोन ही बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र, तिची बहीण अनिशा चित्रपटापासून दूर आहे. अनिशा ही लहानी बहीण दीपिकापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. ती चित्रपटात नसली तरी खेळात प्राविण्य मिळवले आहे. ती गोल्फर असून तिने वयाच्या 12 व्या वर्षांपासून खेळण्यास सुरुवात केली आहे. सलमान हा बहीण अर्पितावर खूपच प्रेम करतो. तिन्ही भावांची लाडकी अर्पिता चित्रपटापासून दूर आहे.
भिषेक बच्चनची बहीण श्वेता नंदा ही वडील अमिताभ बच्चन यांची लाडकी आहे. ती लेखिका, पत्रकार, होस्ट, मॉडेल राहिली आहे. श्वेता चित्रपटात नसली तरी जाहिरातीत दिसली आहे.
सोनम परब