नवी दिल्ली – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना बुधवारी सीबीआयने दणका दिला आहे. सीबीआयने कथीत आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी रावत यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा दाखल केला आहे. उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांनी 2016मध्ये आपले सरकार वाचविण्यासाठी काही आमदार खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
यानंतर उत्तराखंडमधील कॉंग्रेस सरकार अल्पमतात आले होते. याप्रकरणी 31 मार्च 2016 रोजी राज्यपालांनी हरीश रावत यांच्याविरुद्ध सीबीआयला चौकशी करण्याची परवानगी दिली होती.
यानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी अहवाल उत्तराखंड उच्च न्यायालयात सादर करत हरीश रावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करत रावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मंजुरी देत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.