बडोदा – गुजरातमधील बडोदा येथे 87 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अभिषेक सुर्वे आणि सुमित नंबियार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बडोदामधील संगम परिसरात बनावट नोटा बनविणाऱ्याचे रॅकेट असल्याची गुप्तहेरांकडून खरब मिळाली होती. यानुसार विशेष पथकाकडून सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
या संशयितांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 500 रुपयांच्या 175 बनावट नोटा आढळून आल्या. यातील आरोपी अभिषेक सुर्वे हा पदवीधर असून त्याचा एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर दुरुस्तीचा व्यवसाय असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.