नवी दिल्ली/जिनेव्हा : जागतिक स्पर्धात्मकता जागतिक निर्देशांकात भारत 10 स्थानांनी घसरण होऊन 68 व्या क्रमांकावर पोहोचला. तर जगातील सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्था म्हणून अमेरिकेला मागे सारत सिंगापूरने पहिले स्थान पटकावले.
निर्देशांकाची घोषणा करताना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले की, सुक्ष्मअर्थव्यवस्थेचे स्थैर्य आणि बाजारपेठीय आकार यात भारताचा क्रमांक अव्वल आहे. आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण मोठे असूनही आर्थिक क्षेत्र सखोल आणि स्थीर आहे. मात्र त्यामुळे बॅंकिंग क्षेत्राची सक्षमता कमकुवत झाली आहे. व्यावसाय संचलनात भारताने 15व्या स्थानावर झेप घेतली आहे. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात भारताला मोठा विकास करावा लागेल. यात भारताची घसरण 107व्या स्थानी असून महिलांच्या रोजगारात 128व्या स्थानावर आहे. तर कर्मचारी योग्यतेच्या निकषावर भारत 118व्या स्थानावर आहे.