बॉलीवूडचा छोटा नवाब सैफ अली खानने अलीकडेच हिंदी चित्रपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या एकतर्फी प्रेमाच्या कथांबाबत भाष्य केले आहे. याबद्दल बोलताना त्याने शाहरुखबाबतही एक विधान केले आहे. तो म्हणतो शाहरुखनेही स्टॉकरची म्हणजेच मुलींचा पाठलाग करणाऱ्या रोमिओची व्यक्तिरेखा साकारत करिअरची सुरुवात केली होती. भारतीय सिनेमामध्ये मेल स्टॉकर हा जणू एक अविभाज्य घटकच बनला आहे की काय असे वाटते. अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा असणारे चित्रपट तिकिट खिडकीवरही तुफान चालतात याचे आश्चर्य वाटते, असे सैफ म्हणतो. सैफने या श्रेणीमध्ये “रांझना’मधील धनुषची व्यक्तिरेखा आणि “डर’मधील शाहरुखच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख केला आहे.
सैफ पुढे म्हणतो की, स्टॉकरची व्यक्तिरेखा कथानकात मुख्य स्थानी आणणे ही हॉलीवूडची कॉपी आहे. नाही तरी बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट हे हॉलीवूडचेच कॉपी केले जातात असे तो म्हणतो.
सैफने याबाबत “बाजीगर’चे उदाहरण दिलेआहे. “बाजीगर’ हा चित्रपट हॉलीवूडमधील ” अ किस बिफोर डाईंग’ या चित्रपटाच्या कथानकावर आधारित होता. या हॉलीवूडपटातही नायक बदला घेण्यासाठी श्रीमंत उद्योगपतीच्या घरात प्रवेश करतो आणि एकामागून एक मुलींना मारून टाकतो. तेच कथानक जसेच्या तसे “बाजीगर’मध्ये उतरवण्यात आले. आता सैफच्या या विधानाबाबत शाहरुख काय भाष्य करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
View this post on Instagram
Meet my Dashing Daddy Cool in his new @selectedindia campaign! #dashingdad #suave ????