पुणे – दीड दिवसाच्या गणपतीचे मंगळवारी विसर्जन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून दुपारी 12 वाजता 3,424 क्युसेकने नदीमध्ये विसर्ग करण्यात येणार आहे. प्रकल्पातील चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
प्रकल्पात एकूण 28.67 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, प्रकल्पात सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. यात खडकवासला-1.97, पानशेत-10.65, वरसगाव-12.82 आणि टेमघर धरणात 3.28 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.